16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयऐतिहासिक वारसा स्थळे आता दत्तक घेता येणार

ऐतिहासिक वारसा स्थळे आता दत्तक घेता येणार

केंद्राची योजना, पुण्यातील शनिवारवाड्यासह ५ स्थळांचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना जाहीर करण्यात आली. या नव्या योजनेनुसार पुणे शहरातील शनिवारवाड्यासह पुणे जिल्ह्यातील एकूण ५ ऐतिहासिक वारसा स्थळ आता दत्तक घेता येणार आहेत. पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून ही नवी योजना सुरू करण्यात आली.

या योजनेचे नाव अ‍ॅडॉप्ट अ हेरिटेज योजना असे आहे. वारसा स्थळांची नियमित देखभाल तसेच संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी वारसा स्थळे संस्थेला दत्तक देण्याची केंद्राची नवी योजना असणार आहे.

पुण्यातील हे ऐतिहासिक स्थळे दत्तक दिली देणार
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी, लोहगड, कार्ला लेणी आणि भाजे लेणी यांचा समावेश असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR