25.3 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्सवादरम्यान लेझर, डीजेच्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका

उत्सवादरम्यान लेझर, डीजेच्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या गणपती उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. या उत्सवामध्ये सर्रास लेझर बीम लाईट आणि डीजेचा वापर केला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदुषण होते. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. तर लेझर बीम मुळे डोळे खराब होत असल्याच्या काही तक्रारी गेल्या वर्षी समोर आल्या होत्या.

त्यामुळे आता लेझर बीम लाईट आणि डीजेचा वापराविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडून ही जनहित याचिका करण्यात आली आहे. या चाचिकेची दखल मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने घेतली आहे.

डीजेच्या जोर जोरात येणा-या आवाजाने अनेकांच्या श्रवणशक्तीवर आणि हृद्याच्या ठोक्यावर परिणाम होत आहे. यासोबतच डीजेच्या दणदणाटाने अनेक जुन्या इमारतींमध्ये कंपने निर्माण होत असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील सत्येंद्र मुळ्ये यांनी या याचिकेत म्हटले आहे.

त्यावर सण उत्सवामध्ये ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे या याचिकाकर्त्यांनी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शानास आणून द्यो आणि त्याबाबत माहितीचा समावेश असलेले निवेदन सादर करावे, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत.

न्यायालयावे हस्तक्षेप करावा – याचिकाकर्त्यांची मागणी

दरम्यान, लेझर बीमचा त्रास कमी करण्यासाठी कोणतीही विशिष्ट नियमावली नाही. त्यासाठी कोणी तक्रार केली, निवेदन दिले तरीही कारवाई केली जात नाही. या प्रकरणामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करून योग्य आदेश द्यावेत असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR