26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeपरभणीपुराच्या पाण्यात वाहून गेली बस ; चालक,वाहक सुखरूप

पुराच्या पाण्यात वाहून गेली बस ; चालक,वाहक सुखरूप

मानवत : पुराच्या पाण्यात बस वाहत गेल्याची घटना मानवत तालुक्यातील वझुर (बु.) या गावी पहाटे चारच्या सुमारास घडली. वझुर गावी पाथरी आगाराची ही बस मुक्कामी होती. चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख हे दोघे बसमध्ये झोपलेले होते.

पहाटे पाणी शिरल्याचा आवाज येत असल्याचे लक्षात आल्यावर दोघांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला. परंतु बस चालू होण्यास वेळ लागला. तो पर्यंत एक मोठा पाण्याचा लोंढा आला आणि बस जागा सोडून वाहू लागली. प्रसंगावधान राखून चालक व वाहक यांनी बसमधून उड्या मारल्या व जीव वाचवला.बस १००मीटर पेक्षा अधिक दूर पाण्यात वाहून गेली. एका खांब्याजवळ जावून अडकल्याची माहिती हाती आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR