24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeलातूरडॉ. यादव, फपागिरे, चिंचोले यांना ‘शाहू भूषण’ पुरस्कार

डॉ. यादव, फपागिरे, चिंचोले यांना ‘शाहू भूषण’ पुरस्कार

लातूर : प्रतिनिधी
शिव छत्रपती शिक्षण संस्था, लातूरच्या वतीने संस्थेअंतर्गत सलग पंधरा वर्षे पेक्षा जास्त, प्रामाणिक व पूर्ण निष्ठेने काम करणा-या गुणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना ‘शाहू भूषण’पुरस्काराने गौरविले जाते. दि.  ५ सप्टेंबर रोजी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे शिक्षक दिनानिमित्त ‘शाहू भूषण’ पुरस्कार वितरण समारंभ पार पडले. या समारंभात डॉ. अभिजीत यादव, योगेश्वरी फपागिरे, विवेकानंद चिंचोले यांचा गौरव करण्यात आला.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष   डॉ. गोपाळराव पाटील, यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सदस्य डॉ. रावसाहेब कावळे, अ‍ॅड. शहाजी मनाळे यांच्या हस्ते सत्कारमुर्तीं त्यांच्या सौभाग्यवतीसाठी साडीचोळी प्रदान करुन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मंचावर  प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलचे संचालक माजी प्राचार्य बी.ए. मैंदरगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. अनुजा जाधव आणि प्रा. सुदर्शन पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता मिनाक्षी भारती यांनी पसायदानाने केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR