19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रदेशामध्ये जीएसटीत मुंबई अव्वल

देशामध्ये जीएसटीत मुंबई अव्वल

ठाणे : प्रतिनिधी
देशात जीएसटीतून मिळणा-याया २ लाख कोटी जीएसटीपैकी ७० हजार कोटी जीएसटी हा मुंबईतून जात असल्याने देशात मुंबई अव्वल ठरली आहे. मात्र त्या तुलनेत केंद्राकडून मुंबईला परतावा मिळत नसल्याने नाराजीचाही सूर आहे.

वस्तू आणि सेवा कर संकलनात (जीएसटी) महाराष्ट्राने अव्वल स्थान कायम राखले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र राज्याने वस्तू व सेवा कर संकलनाचा उच्चांक गाठला असून पहिल्यांदाच ३ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात ३.२ लाख कोटी जीएसटी संकलन झाले असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात १८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या देशातील एकूण वस्तू व सेवा कर संकलनातील वाटा १६ टक्के राहिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत (१५ टक्के) त्यामध्ये सुमारे १ टक्क्याची वाढ दिसून येत आहे.

राज्यास जीएसटीतून उच्चांकी महसूल
राज्याच्या निव्वळ महसुलाचा विचार करता, राज्यास जीएसटीतून १,४१,७०० कोटी एवढा उच्चांकी महसूल प्राप्त झाला आहे. राज्य व सेवाकराच्या माध्यमातून ९३,४०० कोटी तर एकात्मिक कराच्या माध्यमातून ४८,३०० कोटींचा महसूल तिजोरीत जमा झाला. पेट्रोल व मद्य उत्पादनावरील मूल्यवर्धित कराचा महसूल ५३,२०० कोटी राहिला आहे. वस्तू व सेवा कर, मूल्यवर्धित कर, व्यवसाय कर यांच्या एकंदरीत महसुलाचा राज्यातील वृद्धी दर हा ११ टक्के नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR