मानवत : शहरातील वैभवात भर टाकणा-या बाजार रोडचे उद्घाटन आ. राजेश विटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्ते कामाच्या निधीसाठी मानवतचे युवा व विकासशील नेतृत्व अंकुश लाड यांनी भक्कम पाठपुरावा केला होता. हा मुख्य रस्त्यावरील विवेकानंद चौक ते डॉ. खडसे यांचे घर आणि तेथून पाळोडी रोड पर्यंतचा चाळीस फुटाचा दुतर्फा विद्युत रोषणाई असणारा सीसी रोड तयार होणार आहे.
शहरातील मुख्य रस्त्यासह संत सावतामाळी मार्ग, संत जगनाडे महाराज चौक ते राष्ट्रीय महामार्ग, शिवाजी नगर, गोलाईत नगर या रस्त्या नंतर शहराच्या वैभवात भर टाकणा-या वरील रस्त्याचे उद्घाटन झाले आहे. शहराचा मुख्य रस्ता व बाजार रोडवर मानवतचा आठवडे बाजार भरत असतो. मागील ब-याच वर्षांपासून या रस्त्याचे काम झालेले नव्हते. त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे झाले होते. रस्ता दुरुस्तीच्या पुढच्या टप्प्यात पोहोचला होता. याची दखल घेत युवानेते डॉ. लाड यांनी या रस्त्याच्या कामासाठी शासन दरबारी निधीसाठी प्रस्ताव टाकला आणि तो प्रस्ताव मंजुरही झाला. परिणामी या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.
या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करताना आ. विटेकर म्हणाले की, मानवत शहराच्या कोणत्याही विकास कामासाठी या पुढील काळात निधी कमी पडू देणार नाही. तर युवानेते लाड यांनीही आपण शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, नेताजी सुभाष विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक जी. एस. सिखवाल, माजी नगराध्यक्ष गणेश कुमावत, केकरजवळाचे सरपंच संतोष लाडाने, के. एस. शिंदे, उद्धव हरकळ, विठ्ठलराव डांगे, नगरसेवक विनोद रहाटे, दत्ता चौधरी, बालाजी कु-हाडे, शिवाजी पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, अर्जुन कच्छवे, विठ्ठलराव कच्छवे, विष्णू सावंत, शंकर वावरे, ज्ञानेश्वर कौसाईतकर, मुकद्दर भाई, हबीब भडके, शफी अन्सारी, नजीर विटेकर, अलीम शेख, अशोक होगे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.