परभणी : लोककलेच्या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृतीचे वैभव बालकांना कळावे आणि मौज मजा करत त्यांच्यात हे संस्कार रुजल्या जावेत हा या महोत्सवाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तर गॅझेट आणि मोबाईल पासून बालकांना दूर ठेवण्यासाठी बालरंगभूमीचे कार्य असल्याचे प्रतिपादन बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्ष तथा चित्रपट अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांनी केले.
बालरंगभूमी परिषद मुंबई यांच्या वतीने व बालरंगभूमी परिषद परभणी शाखेच्या द्वारा दि.२२ सप्टेंबर रोजी वैष्णवी मंगल कार्यालय येथे आयोजित जल्लोष लोककलेचा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.स्वागताध्यक्षपदी माजी महापौर प्रताप देशमुख, प्रमुख पाहुणे डॉ. संध्याताई दुधगावकर, संतोष धारासुरकर, गुलाबराव कदम, परभणी शाखेचे अध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष नितीन लोहट, त्र्यंबक वडसकर, गिरीश क-हाडे, अनिकेत सराफ, अनंत पांडे आदींची उपस्थिती होती. या महोत्सवास बालरंगभूमी मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, सहकार्य आसिफ अन्सारी, सदस्य अनंत जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी किशोर पुराणिक, विजय करभाजन आदींची उपस्थिती होती. या महोत्सवास विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
यावेळी प्रताप देशमुख यांनी कलाकारांसाठी रंगमदीर नसल्याची खंत व्यक्त केली. यशस्वीतेसाठी बालरंगभूमीचे कार्याध्यक्ष उपेंद्र दुधगावकर, सहकार्यवाह अर्चना चिक्षे, कोषाध्यक्ष संजय पांडे, कार्यकारी सदस्य किशोर विश्वमित्रे, प्रकाश बारबिंड, प्रशांत ढोले, संदीप राठोड, सिद्धेश्वर जाधव, राजू वाघ, महेश देशमुख, सचिन आढे, नागेश कुलकर्णी, व्यंकटेश देशमुख, अनिकेत शेंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रमोद बल्लाळ तर आभार नितीन लोहट यांनी मानले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एकल वादन, गायन, नृत्य, सामूहिक नृत्य या स्पर्धेत जवळपास ५०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यावेळी रसिकांनी मोठी गर्दी केली होती.