छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मागच्या काही काळापासून आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे भाजपा खासदार नितेश राणे हे सातत्याने मुस्लिम समाजाविरोधात विधाने करत आहेत. दरम्यान, ओवेसींच्या पायजम्याची साईज टिंगूपेक्षा मोठी, असे म्हणत माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी करत सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईपर्यंत तिरंगा संविधान रॅली काढली होती. या आंदोलनाचे नेतृत्व करताना इम्तियाज जलील यांनी दोन्ही नेत्यांवर प्रक्षोभक विधानं केल्याचा आरोप केला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की, पोलिसांनी आमच्या मोर्चाला मुलुंडजवळ रोखले. त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नाही. सर्व कायदे केवळ आमच्याविरोधातच लागू केले जाणार का? हे लोक जाणीवपूर्वक आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात फुटीरतावादी समाज तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे.