29.9 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeसोलापूरमुंबईचे ज्येष्ठ साहित्यिक फरीद खान यांचा सत्कार

मुंबईचे ज्येष्ठ साहित्यिक फरीद खान यांचा सत्कार

सोलापूर – मुंबईचे ज्येष्ठ उर्दू साहित्यिक व उर्दू कारवाँ चे अध्यक्ष फरीद खान यांचा ज्येष्ठ रंगकर्मी सय्यद इकबाल यांच्या हस्ते शाल, बुके व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला .

या वेळी अभा मुस्लीम मराठी साहित्य परिषदचे सचिव अय्यूब नल्लामंदू यांनी डॉ . फरीद खान यांचा व त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. या वेळी उर्दू विभाग प्रमुख प्रा’. डॉ . शफी चोबदार , भारतीय उर्दू विकासचे सुलतान अख्तर , विरसा फौडेशनचे मजहर अल्लोळी , कवि वजाहत सत्तार , डॉ. गौस शेख , सफदर सय्यद इत्यदिनीं सोलापूरात होत असलेल्या उर्दू मराठी साहित्य व रंगभूमीच्या कार्याची माहिती सांगितली ,

सोलापूरात होत असलेल्या साहित्य सेवे बद्दल डॉ . फरीद खान यांनी सोलापूरकरांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले . सुत्र संचलन अय्यूब नल्लामंदू यांनी केले तर आभार सफदर सय्यद यांनी मानले .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR