पालम : आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गंगाखेड विधानसभा मतदारसंघ अंतर्गत पालम तालुक्यात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसिल कार्यालय पालम यांच्या वतीने दोन पथक नियुक्ती करुन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहीम शहरी व ग्रामीण भागात दि.२७ सप्टेंबर पासून सुरुवात करण्यात आलेली आहे.
त्या अनुषंगाने सदरील पथकाणे पालम शहरात, ग्रामीण भागात वाडया ताडया वस्त्यामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती करून मतदाराचा मतदानाचा टक्का व नवयूवकासाठी व्हीव्हीपट मशीनवरील विश्वास वाढवण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. या जनजागृती मोहिमेस ग्रामीण व शहरी भागात उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.
सदरील पथक पुढील दोन दिवस शहरी व ग्रामीण भागात मोबाईल व्हॅनव्दारे सर्व मतदान केंद्रावर, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत येथे प्रत्यक्ष जाऊन मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व मतदारांनी सदरील पथकाकडून प्रात्यक्षिक पाहणी करुन आपल्या मताची खात्री करुन घ्यावी.
याबाबत काही शंका असल्यास त्याचे निरसन सदरील पथकाकडून करण्यात येत आहे असे आवाहन तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी सांगितले. या मोहिमेसाठी नायब तहसिलदार राजेश्वर पवळे, विनोद पवार, भागवत प्रकाश अया, सहकारी कर्मचारी मास्टर ट्रेनर भागवत पतकोंडे आदी परिश्रम घेत आहेत. यामुळे ग्रामीण भागात या मोहिमेला उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.