15.3 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रबसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल

बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल

बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल

मुंबई : देशाचे परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रीक बसमध्ये (इ४२) हवाई सुंदरीप्रमाणे बस सुंदरी असणार असल्याचे पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते. त्यानंतर, आता पुणे मार्गावर धावणा-या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भरत गोगावले यांनी सांगितले. विशेष म्हणजे प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. मात्र, आता या योजनेवरुन आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भरत गोगावले यांच्या विधानाचा संदर्भ देत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, या निर्णयाबद्दल भरत गोगावलेंचे पायच धरायला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

शिवनेरी बसमधील या महिलांना छत्री द्यावी लागेल, कारण बसमध्ये पावसाचं पाणी गळत आहे. विमान आणि बसची तुलना करणे म्हणजे भरत गोगावले यांचे पाय धरले पाहिजे, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी या योजनेवर खिल्ली उडवली. तसेच, एसटी महामंडळाकडे चार चांगल्या बस नाहीत, चांगले ड्रायव्हर ठेवू, चांगले कंडक्टर ठेवू असं काहीतरी बोला. या सुंदरी काय करणार आहेत, बसमध्ये काय सेवा देणार आहेत? काय खायला देणार आहेत, काय प्यायला देणार आहे?, असे सवाल आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत. शिवनेरी सुंदरी नेमकं करणार काय आहेत ते आधी सांगा. शिवनेरी सुंदरी काम काय करणार आहे फक्त भरत भोगावले यांनी सांगाव असेही आव्हाड यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR