परभणी : परभणी मतदार संघातील ५० गावे व शहरातील १२ प्रभागात आतापर्यंत वंदनीय बाळासाहेब ठाकरे मोफत सर्वरोग निदान तपासणी व मोतीबिंदू मुक्त परभणी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व पूर्व तपासणी शिबिर घेण्यात आले आहेत. या उपक्रमात २७ हजार नागरीकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. त्यासोबत आवश्यक उपचार करण्यात येत आहेत अशी माहिती आ. डॉ. राहूल पाटील यांनी दिली आहे.
परभणी मतदारसंघांमध्ये आ. डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे मोफत सर्वरोग निदान तपासणी शिबीर घेण्यात येत आहेत. पुर्व तपासणीत दोष अढळ्यास त्या रुग्णावर ताक्ताळ आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपचार करण्यात येत आहेत. आवश्यक त्या शस्त्रक्रिया देखील करण्यात येत आहेत. रुग्णांच्या घरापासून ते परभणी मेडीकल कॉलेज पर्यंत प्रवासाची मोफत सोय करण्यात आली आहे. आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे सर्व प्रकारच्या सुवीधा मोफत दिल्या जात आहेत. रक्तदाब, मधुमेह, अस्थिरोग, रक्ताच्या विविध तपासणी अशा आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहेत. या उपक्रमाला नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
२७ हजार नागरीकांना मोफत चष्मे वाटप
मोतीबिंदू मुक्त परभणी विधानसभा मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात आणि शहरात शस्त्रक्रिया पूर्व नेत्र तपासणी शिबिर घेतले जात आहेत. परभणी विधानसभा मतदार संघातील ५० गावात हे शिबिर पूर्ण झाले आहे. या शिबिरात ४० हजार नागरिकांची नेत्र तपासणी करून ज्या नागरिकांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा नागरिकांना गरजेनुसार सर्व शस्त्रक्रिया आ.राहुल पाटील यांच्या आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मोफत करण्यात येत आहेत. या शिबिरात नेत्र तपासणी करून ज्यांना वाचनासाठी त्रास होतो अशा ४० वर्षांवरील नागरिकांना वाचनासाठी अत्यंत उच्च दर्जाचे चष्मे मोफत देण्यात येत आहेत. आतापर्यंत २७ हजार नागरीकांना चष्मे वाटप करण्यात आले आहेत. या शिबिरासाठी आ.डॉ. पाटील यांचे सर्व आरोग्य समन्वयक दिवसरात्र कार्यरत आहेत. परभणी शहरातील १२ प्रभागात तपासणी करून चष्मे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रभागात येत्या १० दिवसात ही तपासणी पूर्ण करून चष्मे वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील देखील ही तपासणी मोहीम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.