24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeपरभणीसेलू उपजिल्हा रूग्णालयाला केंद्र सरकारचा कायाकल्प पुरस्कार

सेलू उपजिल्हा रूग्णालयाला केंद्र सरकारचा कायाकल्प पुरस्कार

सेलू : केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कायाकल्प पुरस्कार येथील उपजिल्हा रुग्णालयास मिळाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये १ लाख व सन्मानपत्र असे आहे.

राज्यस्तरीय परीक्षण समितीमार्फत परिसर स्वच्छता, अंतर्गत स्वच्छता, निजंर्तुकीकरण रुग्णाचे समाधान पत्रक, प्रसूती व इतर आरोग्यदायी सुविधांच्या संदर्भात करण्यात आलेल्या सेवेच्या निकषाचे मुद्द्यानुसार मराठवाडा विभागातून दिल्या जाणारा उपजिल्हा रुग्णालय पातळीवरचा सदरचा हा पुरस्कार सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयास मिळाला आहे.

यात सन २०२३-२४ मध्ये ८८ हजार ६२८ रुग्णावर बा रुग्ण विभागात उपचार करण्यात आले. तसेच १२५९३ रुग्णावर अंतर रुग्ण विभागात उपचार करण्यात आले. याशिवाय उपजिल्हा रुग्णालयात ८६८ प्रसूती त्यापैकी ६०५ स्वाभाविक व २६३ सिझेरियन प्रसूती करण्यात आल्या. तर ५२ हजार ५८८ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. तसेच ४०४ गरोदर मातांना सोनोग्राफीची सुविधा पुरविण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयात ६५२ मोठ्या व १५८७ लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात ६८ लहान मुलावरती शस्त्रक्रिया करण्यात आल्या व ह्रदयरोग तपासणी सुद्धा करण्यात आली.

येथील उपजिल्हा रुग्णालयात एक्स-रे सुविधा, एच एल एल मार्फत रक्त तपासणी, इतर लहान मोठ्या शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्याकरिता वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनार्दन गोळेगावकर यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. सदरचा पुरस्कार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश लखमवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्य तत्परतेमुळे पुरस्कार मिळाल्याचे मत वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोळेगावकर यांनी व्यक्त केले.

सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सेलू डॉक्टर असोसिएशनच्या वतीने डॉ. गोळेगावकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. ऋतुराज साडेगावकर, बाळासाहेब जाधव, डॉ, प्रवेश बिनायके, डॉ. सुदर्शन मालानी, डॉ. आशिष मेहता, डॉ. आलेश बुरेवार आदी उपस्थित होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR