17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात बुधवारपासून मेघगर्जनेसह पाऊस?

राज्यात बुधवारपासून मेघगर्जनेसह पाऊस?

पुणे : प्रतिनिधी
राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहे. त्यामुळे बुधवारपासून (९ ऑक्टोबर) ते शनिवारपर्यंत (१२ ऑक्टोबर) राज्यभरात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातून मोसमी वा-याचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरून काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे हवेच्या वरच्या स्थरात कोरड्या उष्ण वा-याची आणि बाष्पयुक्त वा-याची घुसळण होऊन विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सायंकाळी पडण्याचा अंदाज आहे. स्थानिक पातळीवर दुपारपर्यंत तापमान वाढून सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

भारतीय हवामान विभागाने ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे पावसाची शक्यता मावळली आहे. पण ९ ते १३ ऑक्टोबर या काळात पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR