रेणापूर : प्रतिनिधी
एकीकडे शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देऊन, आपले पीक पिकवतो. पण काबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतक-यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळत नाही. सरकारकडून सोयाबीन, उडीद, मूगासह सर्वच पिकांना योग्य मोबदला दिला जात नाही. तर दुसरीकडे हेच महायुतीचे सरकार मात्र जाहिरात करण्यात मग्न असल्याची घणाघाती टीका आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली. रेणापूर येथे आयोजित गोर बंजारा मेळाव्यात ते बोलत होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व समनक जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोर बंजारा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. श्री जगदंबा देवी नवरात्र महोत्सवानिमित्त कै. मिठाराम रुपचंद राठोड यांच्या स्मरणार्थ गोर नंगारा व महिला बचत गटांना या कार्यक्रमात पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार देशमुख यांच्या हस्ते नगारा वादनाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणापूरच्या माजी सरपंच श्रीमती उषाताई राठोड, उद्घाटक विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, हिम्मतंिसंग महाराज, रीड लातूरच्या संचालिका दीपाशिखा देशमुख, सुनिता आरळीकर, सर्जेराव मोरे, विजय देशमुख, अनंतराव देशमुख, प्रमोद जाधव, उमाकांत खलंग्रे, गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार शेषराव हाके, एल टी चव्हाण, बळीराम जाधव, रामराव महाराज यांची उपस्थिती होती.
आमदार धिरज देशमुख म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारने सर्व समाज घटकांचे हीत जोपासण्याचे काम केले. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा झाला. नियमित कर्जफेड करणा-यांंना प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. माविआने अतिवृष्टी, कोरोना आपत्तीत चांगले काम केले. हे सरकारचे दायीत्वच आहे. आज महायुती सरकारकडून एखादी योजना आणली तर अर्धा खर्च जाहिरातीवर केला जातो. शेतकरी पिकविमा मागतोय, शेतीच्या नुकसानीची भरपाई मागतोय, सुशिक्षीत तरुण रोजगार मागत आहेत, महिला सुरक्षितता मागत आहेत, ते त्यांना मिळत नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एखाद्या योजनेचा निधी वळवून दुसरी योजना पुढे आणली जाते. हे सरकारचे अपयश आहे.’’
येणा-या काळात बंजारा समाजाचे प्रश्न सोडविणे, त्यांना न्याय, हक्क देण्यासाठी पक्षाचे नेते नाना पटोले, राहुल गांधी यांच्या माध्यमातून आपण काम करीत आहोत. याआधीही काँग्रेस पक्षाने बंजारा समाजाला राज्यातील सर्वोच्च पद देऊन गौरव केला. शेतक-यांंना पुढे येण्याचे काम आपले वसंतराव नाईक यांनी केले. हीच शिकवण आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असे ते म्हणाले.कार्यक्रमास संदीप राठोड, खेमाबाई राठोड, मालनबाई चव्हाण, प्रदीप राठोड, जयंिसग जाधव, अशोक राठोड, अजय राठोड, जयश्री राठोड, पूजा इगे , शोभा राठोड, सुरेखा राठोड, शरद राठोड, विलास राठोड, सतीश चव्हाण, दयानंद राठोड, दयानायक राठोड, धोंडीराम चव्हाण, सुरेश राठोड, विकास बंजारा, अविनाश राठोड, गोंिवद राठोड, महादेव चव्हाण, बालाजी राठोड आदीसह बंजारा समाजबांधव तसेच समनक, गोरसेना व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप राठोड यांनी केले तर अशोक राठोड यांनी आभार मानले.