लातूर : प्रतिनिधी
आम्ही फार भाग्यवान आहोत की, आम्हाला या महाविद्यालयामध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. विद्यार्थ्यांच्या अंगीकृत असणा-या विविध कलागुणांना वाव देणारे व विकसित करणारे मंडळ म्हणजेच सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळ होय. या मंडळामुळेच माझ्यासारखे कलावंत, सामाजिक कार्यकर्ते तथा एक सुजाण नागरिक बनवण्याचे कार्य केले जाते, असे सांगून विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून लांब राहावे, असाही सल्ला चित्रपट नायिका व लावण्यवती तनुजा शिंदे यांनी दिला.
दयानंद कला महाविद्यालयामध्ये सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळाचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रपट नायिका व लावण्यवती तनुजा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड होते. यावेळी डॉ. रामेश्वर खंदारे व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिका-यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळाच्या वतीने दीपिका यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी आजच्या समाजातील तरुणांमध्ये सामाजिक आत्मीयतेची आणि जवळीकतेची भावना निर्माण करण्याचे कार्य हे महाविद्यालय करते. तसेच सामाजिक शास्त्रांच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये अधिक अधिक यश संपादन करावे अशी भावना या प्रसंगी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी दीपिका यादव, वसंत कुलकर्णी, अंिजक्य आदमाने, गणेश जाधव, कामाक्षा मुढाळे, व अर्णव पाटील, राहुल कांबळे या विद्यार्थ्यांनी अर्थक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रामेश्वर खंदारे यांनी केले. सूत्रसंचालन अर्णव पाटील व आदिती कुलकर्णी या विद्यार्थिनींनी केले. त्रिमुख इगवे यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. चैतन्य शिंदे, प्रा. स्फूर्ती समुद्रे, प्रा. अश्विनी धायगुडे यांनी देखील सहकार्य केले. प्रा. यादव आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित दर्शविली.