नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरू येथे होणा-या पहिल्या कसोटीवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. हा सामना १६ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार असून या दिवशी बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर यानंतर उर्वरित चार दिवसही पाऊस पडणार असल्याची चर्चा असल्याने हा सामना होणार का नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. हवामानाचा अंदाज खरा ठरल्यास आणि पहिला कसोठी सामना रद्द झाल्यास भारतीय संघासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामाना खेळण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागेल.
भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचा प्रबळ दावेदार मानला जातो. टीम इंडिया सध्या डब्ल्यूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये (पीसीटी) अव्वल स्थानावर आहे. उद्यापासून सुरू होणा-या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला पराभूत करून आपला पीसीटी आणखी पुढे नेण्याचा भारताचा प्रयत्न असेल, जेणेकरून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत काही सामने गमावले तरी त्याचा अंतिम सामना खेळण्यावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र बंगळुरुमध्ये होणारा सामन्यात पावसाने धुमाकूळ घातल्या हा सामना रद्द झाला तर रोहित शर्मा आणि भारताच्या आशा धुळीस मिळतील अशी शंका व्यक्त केली जात आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलवर नजर टाकली तर भारतीय संघ सध्या ७४.२४० वर आहे. पण बंगळुरूचा सामना पावसामुळे रद्द झाला तर? अशा स्थितीत सामना अनिर्णित राहील आणि टीम इंडियाचा पीसीटी जो सध्या ७४.२४० आहे तो ७०.८३ इतका कमी होईल. म्हणजे भारताचे मोठे नुकसान होईल. जर आपण न्यूझीलंडबद्दल बोललो, तर हा संघ सध्या ३७.५०० पीसीट गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. जर बंगळुरू येतील सामना रद्द झाला तर त्याचे पीसीटी ३७.०७ पर्यंत कमी होईल. याचा अर्थ पीसीटीनुसार न्यूझीलंडला फारसे नुकसान होणार नाही.