22.5 C
Latur
Sunday, October 20, 2024
Homeपरभणीज्ञान वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नाही : पल्लवी पारवे

ज्ञान वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नाही : पल्लवी पारवे

परभणी : ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नाही ती अभ्यास व कष्ट करुनच मिळवावी लागते. जबाबदारी ही खुप परीक्षा घेत असते, जो निभावतो त्यालाच त्रास होतो. जो त्रास सोसतो तो यश प्राप्त करत असतो असे प्रतिपादन पोलिस विभागात रुजु झालेल्या कु. पल्लवी पारवे हिने वडी येथे नागरी सत्काराला उत्तर देताना केले आहे. पाथरी आगारातील चालक पदावर कार्यरत असणरे रघुनाथ पारवे यांची मुलगी कु.

पल्लवी पारवे हीची निवड मुंबई येथील पोलिस विभागात झाली असून तीने ९ महिन्याचे प्रशिक्षण पुर्ण करुन ती आज दि. २० ऑक्टोबर रोजी आपल्या मुळ गावी वडी येथे तीचे आगमन झाले. माझ गाव, माझे योगदान उपक्रमातील युवकानी, गावातील ग्रामस्थानी तीची भव्य मिरवणूक वडी येथील महादेव नगर येथून काढण्यात आली. गावातील महिलानी तीचे औक्षण करुन तीला पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या मिरवणुकीची सांगता गावातील ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. गावच्या सरंपच व उपसरपंच यांच्या हस्ते तीच्यासह पालकाचा सत्कार करण्यात आला.

या पुर्वी देखील वडी गावातील उसतोड मजुराच्या मुलीने कु. पुनम राजेभाऊ काळे हीची देखील महाराष्ट्र राज्य पोलिस खात्यात निवड झाली आहे. तसेच कु. पल्लवी पारवे हिची देखील मुंबई येथे पोलीस खात्यात रूजू झाली आहे. तर कारभारी शिंदे या शेतक-याची मुलगी कु. प्रियंका शिंदे यांची महाराष्ट्र महसूल विभागात तलाठीपदी निवड झाली आहे. कृष्णकुमार शिंदे (पंचायत समिती चालक) यांचा मूलगा किरण शिंदे यांची महाराष्ट्र पाटबंधारे विभागात, तुकाराम हारणे यांचा मुलगा ज्ञानेश्वर हारणे यांची महाराष्ट्र आरोग्य विभागात निवड झाली आहे व ते पाथरी तालुक्यात आरोग्य खात्यात रूजु झाला आहे. त्यामुळे या गावातून अनेक मुलांनी शासकीय सेवेत दाखल होत आपल्या गावचे नाव पंचक्रोशीत सर्वांच्या परिचयाचे केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR