27.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeपरभणीनिम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

सेलू : सेलू शहरासह परीसरात शनिवार दि. १९ ऑक्टोबर रोजी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने निम्न दुधना प्रकल्पात पाण्याची मोठी आवक सुरू झाल्यामुळे मध्यरात्री १२.३० वाजता पासून प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. रविवारी प्रकल्पाच्या दहा दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसापासून पेरणीच्या उन्हामुळे उष्णतेत भरपूर वाढ झाली होती.

त्यामुळे शनिवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास पावसात सुरुवात झाली. जवळपास ३ तास जोराचा पाऊस पडत होता. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात व निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे शनिवारी निम्न दुधना प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. दरम्यान पाऊस बराच वेळ पडत असल्याने व पाण्याची आवक वाढत असल्याकारणाने रात्री १२.३० च्या दरम्यान प्रकल्पातून करण्यात आलेल्या विसर्गात रविवारी वाढ करण्यात येऊन सुरुवातीस चार दरवाजातून व नंतर दहा दरवाजातून ०.५० मीटरने प्रकल्पाचे दरवाजे उघडून त्यातून जवळपास १० हजार क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

त्यामुळे नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान निम्न दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे बंद करण्यात आलेले असून चार दरवाजातून पाण्याचा विसर्ग चालूच आहे. सद्यस्थितीत निम्न दुधना प्रकल्प केवळ ७५ टक्के पाणीसाठा केला जात आहे. या प्रकल्पातील पाणीसाठ्यामुळे परीसरातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR