पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नव्याने उद्घाटन झालेल्या मंडई मेट्रो स्टेशनला आग लागण्याची घटना घडली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या मंडई मेट्रो स्टेशनला आग लागली. बेसमेंटमध्ये ही आग लागली.
मध्यरात्री बाराच्या सुमारास मंडई मेट्रो स्टेशन येथे तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. अग्निशमन दलाकडून तातडीने ५ वाहने रवाना करीत आग पाचच मिनिटांत आटोक्यात आणली. जवानांनी श्वसनरहित अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारून आग विझविली. जखमी कोणी नसून आग वेल्डिंगचे काम सुरू असताना लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जवानांनी श्वसनरहित अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारून आग विझविली. कोणीही जखमी झाले नसून आग वेल्ंिडगचे काम सुरू असताना लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.