23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंडे यांचे कट्टर समर्थक अंतरवालीत

मुंडे यांचे कट्टर समर्थक अंतरवालीत

बीड : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीबाबतची आपली भूमिका जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण वार-यासारखं बदलताना दिसत आहे. मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अनेक पक्षांतील लोकांच्या रांगा लागल्या आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेल्या नेत्याने पदाचा राजीनामा देऊन जरांगे यांची भेट घेतली. त्यामुळे बीडमध्ये यंदा मोठी उलथापालथ होणार का? अशी चर्चा रंगली आहे.
भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. राजेंद्र म्हस्के हे पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. म्हस्के हे गेली सहा वर्षे बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत.

त्यांनी बीड जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. राजेंद्र म्हस्के बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. काल जरांगे पाटील यांनी त्यांचे उमेदवार येत्या विधानसभेत उभे करणार असल्याची घोषणा केल्यानंतर आज राजेंद्र म्हस्के यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

बीडमध्ये खेला होबे?
बीडमध्ये वंजारी समाज आणि मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये मोठी उलथापालथ करण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपच्या नेत्याने मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने मनोज जरांगे यांच्या डावाला बळ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जरांगे म्हस्के यांना उमेदवारी देणार का? दिल्यानंतर बीडमधील राजकीय गणितं कशी होतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR