25.6 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्र‘मसाल्याची राणी’ झाली महाग

‘मसाल्याची राणी’ झाली महाग

विलायचीच्या उत्पादनात घट

पुणे : प्रतिनिधी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मसाल्याची राणी समजल्या जाणा-या विलायचीचा (वेलदोडे) गेल्या काही वर्षांत विविध खाद्यपदार्थांमधील वापर वाढल्याने स्थानिक बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणीत वाढ झाली आहे.

यावर्षी विलायचीच्या उत्पादनात २० ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी, एक किलो विलायचीचा दर २१०० ते २५०० हजार रुपयांवर पोहोचला आहे. सणासुदीचा काळात ही दरवाढ कायम असल्याने ऐन दिवाळीत सर्वांत जास्त वापर विलायचीचा केला जात आहे.

विलायचीचा सर्वाधिक वापर मसाल्यासाठी केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत विलायचीचा वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये वापर वाढला आहे. पूर्वी केवळ मसाल्यासाठी वापरली जाणारी इलायची आता विविध प्रकारच्या खाद्यपदार्थात, पदार्थांसाठी, दुग्धजन्य मुखवास, तेल काढण्यासाठीही वापरली जात आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा विलायचीला मागणी वाढली आहे.

देशात विलायची उत्पादन केरळ राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ऑगस्ट ते फेब्रुवारी हा विलायचीचा मुख्य हंगाम असला तरी सध्या मागील वर्षीचा साठा असल्याने दर स्थिर आहेत. मात्र यंदा उत्पादनात घट झाल्याने विलायची उत्पादन कमी झाले आहे. यामुळे पुढील तीन महिन्यात आणखीन वाढण्याची शक्यता व्यापा-यांनी वर्तवली आहे.

परदेशात अधिक मागणी
आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय विलायचीचा सुगंध अधिक असल्याने या विलायचीलाच मोठी मागणी आहे. त्यामुळे विलायचीची निर्यात आपल्याकडून अधिक होते. भारतीय विलायचीच्या स्पर्धेत अमेरिकेतील ग्वाटेमाला इलायची देखील आहे, मात्र आपल्या विलायचीचे गुणधर्म तिच्यात अजूनही आलेले नाहीत. त्यामुळे अरब, मध्य पूर्वेकडील देशांत भारतीय वि लायचीला मोठी मागणी आहे.
सध्या दुग्धजन्य पदार्थ जसे श्रीखंड, लस्सी, मिठाई, आईस्क्रीम, फ्लेवर्ड मिल्क यांसह मुखवास आणि इलायचीचे तेल मिळवण्यासाठी हॉटेल उद्योगात वि लायचीचा वापर वाढला आहे. त्यामुळे इलायचीच्या मागणीत वाढ झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR