टोकियो : जपानमधील याकुशिमा बेटावर अमेरिकन लष्कराचे विमान कोसळले असून विमानात आठ अमेरिकन सैनिक होते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यातील आठ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. जपानी कोस्ट गार्डने माध्यमांना सांगितले की बचाव कर्मचार्यांना घटनास्थळी एक व्यक्ती सापडला जो श्वास घेत नव्हता. सरकारी अधिकार्यांचा हवाला देत स्थानिक माध्यमांमध्ये असे वृत्त आले होते की, याकुशिमा येथे विमानाचे अवशेष सापडण्याची शक्यता आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विमान याकुशिमा विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या डाव्या इंजिनला आग लागली. असे मानले जात आहे की हे विमान यामागुची भागातील इवाकुनी तळावरून ओकिनावा येथील काडेना तळावर उड्डाण करत होते. वृत्तानुसार, जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी सांगितले की, विमान रडारवरून गायब झाले होते. तटरक्षक दलाचे म्हणणे आहे की, विमानातून आपत्कालीन संदेश आला आणि त्यानंतर विमान कोसळले.