19 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रसोन्याने ओलांडला ८० हजारांचा टप्पा; चांदी लाखाच्या पुढे

सोन्याने ओलांडला ८० हजारांचा टप्पा; चांदी लाखाच्या पुढे

मुंबई : प्रतिनिधी
सोने आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज (२३ ऑक्टोबर) पुन्हा एकदा सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याचा दर थेट एक लाखाच्या पार गेला आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या भावानेदेखील ८१ हजार रुपयांचा आकडा पार केला आहे.

सोने आणि चांदीचा दर आपल्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. ताज्या माहितीनुसार चांदीचा भाव १५०० रुपयांच्या वाढीसह थेट एक लाख रुपये प्रति किलो ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात ही सलग पाचवी दरवाढ आहे. शुक्रवारी चांदीचा भाव ९९,५०० रुपये प्रति किलोग्रॅम होता. त्यानंतर आता सलग पाचव्या दिवश चांदीचा दर वाढला असून तो १.०१ लाख रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

सोन्याच्या भावातही सध्या वाढ झाली आहे. ८०,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव मंगळवारी ३५० रुपयांच्या तेजीसह ८१,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. सध्या सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे या काळात भारतभरात दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. लग्नसराईलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होते. दुसरीकडे जागतिक पातळीवरही मोठ्या घडामोडी घडत आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळेही सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR