मुंबई : प्रतिनिधी
चहा म्हटले कि चहा प्रेमींना त्यापुढे काहीच दिसत नाही . थंडीच्या दिवसांत तर चहाला खूप मागणी असते. पण येत्या हिवाळ्याच्या काळात तुम्हाला त्यावर अधिक खर्च करावा लागणार आहे. कारण लवकरच ‘टाटा टी’ चहाच्या किमतीमध्ये वाढ करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, देशातील सर्वात मोठ्या चहा कंपनीपैकी ‘टाटा टी’कडे पहिले जाते. हि सर्वात जुनी कंपनी असून , देशात सर्वाधिक विकला जाणारा चहा आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुनीत ए डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार , कंपनी येत्या काही दिवसातच चहाच्या किमतीत वाढ करणार असल्याचे सांगितले आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे वाढलेल्या इनपुट कॉस्टचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर होत आहे. इनपुट कॉस्टमध्ये उत्पादन घटक येतात . यात भूमी,श्रम,भांडवल आणि संयोजक यांच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तोटा होण्यापासून वाचण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे.
चहाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे चहाच्या किमती यावर्षी २५ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. या किमती वाढण्यामागे चहाचे उत्पादन २० टक्क्यांनी घटले असून , निर्यात वाढल्याने देशातील पुरवठा कमी झाला आहे. टाटा टीचा भारतातील चहाच्या बाजारपेठेत २८ टक्के हिस्सा आहे, ज्यामुळे कंपनीची स्पर्धा हिंदुस्थान युनिलिव्हरशी आहे. चहाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे किमतीत झालेली वाढ ग्राहकांवर परिणाम करीत आहे.