ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार (दि.२२) ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) आमदार तथा उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवार (दि.२४) रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंब्रा-कळवा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यापूर्वी आव्हाड यांनी मुंब्रा येथे राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारीच्या दमदार जल्लोषात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
आपल्या शिष्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता उघडया जीपमध्ये उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंब्रा – कळव्यात शक्तिप्रदर्शन करीत मतदारांना अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मुंब्रा – कळवा विधानसभा मतदार संघातून चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला.