19 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeराष्ट्रीयभाजपचे स्टार प्रचारक ठरले

भाजपचे स्टार प्रचारक ठरले

पंतप्रधान मोदी, नवनीत राणा, नारायण राणेंसह ४० जणांची तोफ धडाडणार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात प्रचार करण्यासाठी भाजपकडून ४० स्टार प्रचारकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांना स्थान देण्यात आले आहे. भाजपचे बहुतांशी राज्यांतील मुख्यमंत्री यांचा देखील स्टार प्रचारक यादीत समावेश करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राज्यातील दिग्गजांचाही समावेश आहे. त्यामध्ये नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, अशोक चव्हाण, आशीष शेलार, पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यासह अनेक दिग्गज स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

४० स्टार प्रचारक यादी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा,
राजनाथ सिंह, अमित शहा,
नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, भूपेंद्र पटेल, विष्णू देव साई, मोहन यादव, भजनलाल शर्मा, नायब सिंह सैनी, हेमंत बिस्वा, शिवराज सिंह चौहान, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, शिव प्रकाश, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, नारायण राणे, पीयूष गोयल, ज्योतिरादित्य शिंदे, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, उदयनराजे भोसले, विनोद तावडे, आशीष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, स्मृती इराणी, प्रवीण दरेकर, अमर साबळे, मुरलीधर मोहोळ, अशोक नेते, संजय कुटे, नवनीत राणा.

भाजपने राज्यात २५ हेलिकॉप्टर बूक केले
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने राज्यात उपलब्ध सर्व २५ हेलिकॉप्टर बूक केले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीने राजस्थान, दिल्ली, कर्नाटक आणि गुजरातहून हेलिकॉप्टर मागवल्याचे महाराष्ट्रातील अ‍ॅव्हिएशन कंपन्या सांगत आहेत. मागणी वाढल्याने लोकसभेच्या तुलनेत हेलिकॉप्टर सेवेच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. भाजपने एकाचवेळी बुकिंग केल्यामुळे मविआने राजस्थान, कर्नाटक, गुजरात आणि दिल्लीहून हेलिकॉप्टर महिनाभरासाठी बूक केल्याची माहिती मुंबईतील एका कंपनीने दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR