16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरआयएमए लातूरच्या टिमला आयएमए महाराष्ट्रचे दोन विशेष पुरस्कार

आयएमए लातूरच्या टिमला आयएमए महाराष्ट्रचे दोन विशेष पुरस्कार

लातूर : प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए लातूरच्या वर्ष २०२२-२३ च्या टीमला आयएमए महाराष्ट्राच्या वतीने तत्कालीन अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे यांना विशेष कौतुक पुरस्कार तर आयएमए एमपीएच टीमने राबविलेल्या ‘आओ गांव चले’ या किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक उपक्रमास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय परिषदेत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

आयएमएच्या लातूर शाखेच्या वतीने आरोग्यविषयक तसेच विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. वर्ष २०२२-२३ मध्ये लातूर आयएमएच्या वतीने हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन आले होते. आयएएमच्या सर्वच पदाधिका-यांनी यात सहभागी होऊन संपूर्ण उपक्रम न भूतो न भविष्यती असे यशस्वी केले होते. तत्कालीन आयएमए शाखेचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकुंद भिसे यांसह डॉ. रमेश भराटे , डॉ. सुधीर फत्तेपूरकर, डॉ. शुभांगी राऊत भोसले, डॉ. श्वेता काटकर, डॉ. मनिषा बरमदे ,डॉ. संगीता देशपांडे, डॉ. विश्रांत भारती ,डॉ. संदिपान साबदे, डॉ. अजय जाधव, डॉ. चाँंद पटेल, डॉ. आरती झंवर, डॉ. चेतन जाजू, डॉ. अशोक डाके, डॉ. अनिल वळसे आदी तज्ज्ञ डॉक्टर्सनी यामध्ये आपले भरीव योगदान दिले होते.

या कार्याचा आयएमएच्या महाराष्ट्र शाखेने विशेष गौरव केला. आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, सचिव डॉ. संतोष कदम यांच्या हस्ते संपूर्ण लातूरच्या टीमच्या वतीने डॉ. कल्याण बरमदे व डॉ. मुकुंद भिसे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आयएमए लातूरच्या वर्ष २०२२-२३ च्या डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकुंद भिसे यांसह सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR