26 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeलातूरप्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० योजनेचा लाभ घेणेबाबत

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० योजनेचा लाभ घेणेबाबत

लातूर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० ही केंद्र शासनाची सुधारित योजना शहरी भागामध्ये नुकतीच चालू करण्यात आली आहे. पोषक आहारा अभावी गर्भवती महिला व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवू नये व मातामृत्यू-बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० ही सुधारित योजना चालू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पात्र गर्भवती महिलेने आवश्यक कागदपत्रांची व अटी शर्तींची पूर्तता केल्यानंतर पहिल्या आपत्यासाठी तिला दोन टप्प्यात ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत तसेच दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या पहिल्या चार महिन्यापर्यंतच्या देय लसी पूर्ण झाल्यानंतर ६ हजार रुपये एकाच हप्त्यामध्ये देण्यात येणार आहेत. सदरील अनुदान आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिला, बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला, दिव्यांग महिला तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड असलेल्या ई-श्रम कार्ड असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत.पात्र गरोदर महिलांचे फॉर्म भरुन घेणेबाबत सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. तरी पात्र महिलांनी योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी व फॉर्म भरण्यासाठी आपल्या भागातील एएनएम, आशा स्वयंसेविका तसेच नजीकच्या मनपा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे अथवा मनपाच्या ७७७००१४१३१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR