मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या तिस-या यादीत चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या आधी अजित पवार यांनी दोन याद्यांची घोषणा केली होती.
त्यानुसार अजित पवार यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५० उमेदवारांची घोषणा केली आहे. तिस-या यादीमध्ये खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्याविरोधातील उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली आहे.
तिस-या यादीमध्ये गेवराईमधून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील आणि निफाडमधून दिलीप बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पारनेरमधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.