मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यात २० नावांचा समावेश आहे. शिंदेसेनेच्या पहिल्या उमेदवारी यादीत ४५ नावांचा समावेश होता. त्यानंतर आता पक्षानं आणखी २० जणांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये काही आयात नेत्यांचा समावेश आहे.
निलेश राणे, संतोष शेट्टी, मुरजी पटेल यांना शिंदेंनी उमेदवारी दिली आहे. हे नेते अवघ्या काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेत आले आहेत. वरळीतून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना तिकीट देण्यात आलेले आहे. ते शिवसेना उबाठाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात लढतील. याशिवाय माजी खासदार भावना गवळी, राजेंद्र गावित, संजय निरुपम यांनाही निवडणुकीच्या ंिरगणात उतरवण्यात आले आहे.
अक्कलकुवा – आमशा पाडवी
बाळापूर – बळीराम शिरसकर
रिसोड – भावना गवळी
हदगाव – बाबुराव कोहळीकर
नांदेड दक्षिण – आनंद तिडके पाटील
परभणी – आनंद भरोसे
पालघर – राजेंद्र गावित
बोईसर – विलास तरे
भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे
भिवंडी पूर्व – संतोष शेट्टी
कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर
अंबरनाथ – बालाजी किणीकर
विक्रोळी – सुवर्णा करंजे
ंिदडोशी – संजय निरुपम
अंधेरी पूर्व – मुरजी पटेल
चेंबूर – तुकारामा काते
वरळी – मिलिंद देवरा
पुरंदर – विजय शिवतारे
कुडाळ – निलेश राणे
कोल्हापूर – राजेश क्षीरसागर