24.5 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeलातूरनिलंगेकरांची नाराजी खासदार डॉ. काळगे दूर करतील

निलंगेकरांची नाराजी खासदार डॉ. काळगे दूर करतील

निलंगा : प्रतिनिधी
निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये निलंगेकर परिवाराला डावलून पक्षश्रेष्ठींनी अभय साळुंके यांना काँग्रेसचे तिकीट दिल्याने आशोकराव पाटील निलंगेकर नाराज झाले असतील तर पक्षाच्या वतीने खासदार डॉ काळगे त्यांची नाराजी करतील, असे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
      आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, सामान्य जनतेचा आवाज विधानसभेत बुलंद करण्यासाठी अभय साळुंके यांना उमेदवारी दिली आहे निलंग्यामध्ये बदल घडेल असे सांगून अशोकराव पाटील निलंगेकर यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी काढण्यात येईल. आमचे त्यांचे संबंध अनेक दशकांपासून आहेत. महायुतीला जनता कंटाळली आहे म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय होणार असल्याचा विश्वास माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR