23.3 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeउद्योगऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात ९ टक्क्यांची वाढ

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात ९ टक्क्यांची वाढ

दसरा-दिवाळी धमाका, महाराष्ट्र अव्वल १.८७ लाख कोटींची वसुली

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सणांच्या निमित्ताने बाजारापेठेत मोठी उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी खरेदी केल्याने वस्तू आणि सेवा कराच्या वसुलीमध्ये जोरदार वाढ झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात यावर्षी जीएसटी संकलनात साधारणपणे ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये जीएसटी कलेक्शन १,८७,३४६ कोटींवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर २०२३ मध्ये हे कलेक्शन १.७३ लाख कोटी रुपये होते. जीएसटी रिफंड केल्यानंतर एकूण कलेक्शनमध्ये ८ टक्क्यांची वाढ झाली असून ते १६८०४१ कोटी रुपये झाले आहे.

वस्तू आणि सेवा कराचे ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्याचं एकूण जीएसटी कलेक्शन १,८७,३४६ कोटी रुपये होते. त्यामध्ये सीजीएसटी ३३८२१ कोटी तर एसजीएसटी ४१८६४ कोटी रुपये होते. आयजीएसटी ५४८७८ कोटी आणि सेसे ११६८८ कोटी रुपये इतका होता. ग्रॉस डोमेस्टिक रेवेन्यूमध्ये १०.६ टक्के वाढ पाहायला मिळाली. तर, इम्पोर्टसच्या बाबतीत आयजीेसटी ४४२३३ कोटी रुपये आणि सेस ८६२ कोटी इतका झाला आहे.

एकूण जीएसटी कलेक्शन १,८७,३४६ कोटी असून त्यापैकी १९,३०६ कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात १६,३३५ कोटी रुपयांचा रिफंड करण्यात आला होता. म्हणजे यावेळी १८.२ टक्के वाढ पाहायला मिळाली. यंदाच्या आर्थिक वर्षात १२,७४,४४२ कोटी रुपयांचं जीएसटी कलेक्शन झाले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत जीएसटी कलेक्शन ११,६४,५११ कोटी रुपये झाले होते. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत ९.४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात १४ टक्क्यांची वाढ
राज्यांचा विचार केला असता सर्वांधिक जीएसटी कलेक्शन महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहे. राज्यातील जीएसटी कलेक्शनमध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात ३१०३० कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. तर, गेल्या वर्षी २७३०९ कोटी रुपये झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये ९६०२ कोटी, कर्नाटकमध्ये १३,०८१ कोटी, गुजरातमध्ये ११,४०७ कोटी, हरियाणात १००४५ कोटी रुपयांचे जीएसटी कलेक्शन झाले आहे. या सर्व राज्यांमध्ये जीएसटी कलेक्शन वाढले आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये २ टक्के, मणिपूरमध्ये ५ टक्के आणि छत्तीसगडमध्ये १ टक्के कलेक्शन घटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR