24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमध्ये आयकर विभागाचे छापे

छत्रपती संभाजीनगरमध्ये आयकर विभागाचे छापे

२०० अधिका-यांची पथके ठाण मांडून

छत्रपती संभाजी नगर: छत्रपती संभाजी नगरमध्ये गुरुवारी पहाटेपासून आयकर विभागाने छापेमारीला सुरुवात केलेली आहे. शहरातील अनेक बड्या व्यावसायिकांच्या कार्यालयामध्ये आणि घरावर ही छापेमारी सुरू आहे.

छत्रपती संभाजी नगर शहरातील पाच ठिकाणांवर ही छापेमारी सुरु असल्याचं सांगितले जात आहे. २०० अधिका-यांची पथके नियुक्त करुन आयकर विभागाने धाड टाकल्याची माहिती आहे.
कर चुकवल्याप्रकरणी व्यावसायिकांवर कारवाई केल्याचं बोललं जात आहे. धाड पडलेले लोक बांधकाम व्यावसायिक असून अद्याप त्यांच्याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR