20.4 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रदेर आये दुरुस्त आये

देर आये दुरुस्त आये

मनोज जरांगेंच्या निर्णयाचे भुजबळांकडून स्वागत

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या या निर्णयाचे छगन भुजबळ यांनी स्वागत केले आहे. ‘देर आये दुरुस्त आये’ अशा शब्दांत भुजबळांनी जरांगे पाटील यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य असल्याचे म्हटले आहे.

जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. एका जातीच्या मतावर लढणे शक्य नाही. सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत अशा सूचना जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. त्यावर जरांगे यांनी घेतलेला निर्णय योग्य असून मी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. ‘देर आए दुरुस्त आए’ जरांगे पाटील यांचे म्हणणे योग्य आहे, एका समाजावर निवडणूक लढवली जात नाही. जरांगे यांच्या या निर्णयानंतर आता मराठा बांधव मोकळ्या मनाने मतदान करतील, निवडणुकीत भाग घेतील.

कुठलेही दडपण त्यांच्यावर राहणार नाही असे भुजबळ म्हणाले.
तसेही जर पाहिले तर सर्व पक्षांतून जे उमेदवार उभे राहिले आहेत, त्यातले २० टक्के आरक्षणातले आणि १५-२० टक्के इतर समाजातले असतील. तर उरलेले ६० टक्क्यांपर्यंत उमेदवार हे मराठाच आहेत. त्यामुळे जरांगेंचा निर्णय योग्यच आहे, असे भुजबळांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR