सोलापूर : १ एप्रिल २०२४ पासून ते आजपर्यंत प्रतिबंधित अन्नपदार्थाचा एकूण १० ठिकाणी धाडी टाकून ४९ लाख २६ हजार ३५२ रुपयांचा साठा जप्त केला आहे. तसेच चार वाहने आणि चार पेट्या सील करण्यात आल्या आहेत. या दिवाळीत विविध प्रकारची मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घ्यावी.असे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन सुनील जिंतूरकर यांनी सांगीतले.
दिवाळीतल्या मिठाईने आजारी पडू नये, भेसळ रोखता यावी म्हणून अन्न व औषध प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. मागील काही दिवसांपासून ते दिवाळीच्या तोंडावर प्रशासनाने ४७ ठिकाणी तपासण्या करून १२१ नमुने घेतले आहेत. एका कारवाई २० हजारांची बर्फी आणि कलाकंदही जप्त केला आहे. दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण आहे. फटाके, मिठाई, दिवे हे या सणाचे प्राण आहेत. अनेक कुटुंबांतील दोघेही नोकरी करतात त्यामुळे अशा कुटुंबांना दिवाळी काळात फराळ घरी बनवता येत नाही.
रंगीबेरंगी आणि स्वादिष्ट मिठाईने दुकाने सजत आहेत. पण, भेसळही ओळखता आली पाहिजे. अशा वेळी एक चूक सणाच्या आनंदात अडचणी आणू शकते. त्यामुळे जेव्हाही मिठाई खरेदी कराल, तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा. या काळात अन्न सुरक्षा अधिका-यांची सहा पथके नेमली आहेत. मागील काही दिवसांत शहर व ग्रामीण भागात ४७ ठिकाणी तपासण्या मो केल्या. या तपासण्यादरम्यान १२१ नमुने विश्लेषणासाठी घेतले, तर बर्फी व कलाकंद असा २० हजार २० रुपयांचा ९१ किलो अन्नपदार्थ साठाही जप्त केला आहे. सणासुदीत मिठाईमध्ये भेसळयुक्त मावा वापरला जाऊ शकतो. जे आरोग्याला हानी पोहोचवतात. अशा परिस्थितीत मिठाई विश्वासू दुकानातूनच खरेदी करावी. माव्यात दुधाची पावडर भेसळ करणे घातक आहे. ही भेसळ समजत नसेल तर त्यावर आयोडीनचे दोन ते तीन थेंब टाकावे. मावा निळा झाला तर समजून घ्यावे की त्यात भेसळ आहे.