22.1 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रकॅश व्हॅनमध्ये सापडल्या साडेसहा टन चांदीच्या विटा

कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साडेसहा टन चांदीच्या विटा

मुंबई : प्रतिनिधी
शनिवारी निवडणूक आयोगाने एक कॅश व्हॅन पकडली होती. आज पुन्हा विक्रोळीत मोठा खजिना निवडणूक आयोगाच्या हाती लागला. एका कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत. या चांदीच्या विटांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. या चांदीच्या विटा मुलुंडमधील एका गोदाममध्ये ब्र्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी नेल्या जात होत्या. या प्रकरणाचा तपास निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स, पोलिस करत आहेत.

दरम्यान, आचारसंहितेच्या काळात राज्यभरात पैशांचा पाऊस पडू लागलाय. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत आतापर्यंत कोट्यवधींचे घबाड जप्त केले आहे. मुंबई, पुणे, सोलापूर असो अथवा मराठवाडा, प्रत्येक ठिकाणी कोट्यवधीचे घबाड जप्त केले आहे.

राज्यात आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावी सुरू असून याकाळात नाकेबंदी दरम्यान अनेक शहरांत पैशांचे घबाड जप्त करण्यात आले आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ आणि मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR