28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयपिकअप व्हॅन आणि ट्रकची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू

पिकअप व्हॅन आणि ट्रकची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू

चेन्नई : तामिळनाडूतील वाझापडी जिल्ह्यात गुरुवारी पिकअप व्हॅन आणि पार्सल ट्रकची समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जण ठार तर अन्य एक जण जखमी झाला. पोलिसांनी ही माहिती दिली.एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही धडक इतकी भीषण होती की, चेन्नईहून वाढापडीकडे येणाऱ्या पिकअप व्हॅनमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, व्हॅनचे चालक एम प्रवीण कुमार (२७), के सुदर्शन (४०) आणि ए प्रकाश (५२) अशी मृतांची नावे आहेत.

ट्रक विरुद्ध दिशेने येऊन अत्तूरकडे जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रकचा चालक एस पेचिमुथु पांडियन याच्या पायाला दुखापत झाली असून त्याला वाझापाडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सालेम-चेन्नई बायपास रोडवरील वाढापडीजवळ गुरुववारी हा अपघात झाला,” असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या धडकेत व्हॅनचे मोठे नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक पी. हरिशंकारी व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून नुकसान झालेल्या व्हॅनमधून मृतदेह बाहेर काढले. त्यांनी खराब झालेली वाहने हटवून परिसरातील वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी वाळूपडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR