21.4 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीस यांना मुख्यमंत्री करणे भाजपला भारी पडणार?

फडणवीस यांना मुख्यमंत्री करणे भाजपला भारी पडणार?

 

मुंबई : प्रतिनिधी
महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठं बहुमत मिळालं. पण मुख्यमंत्री पदावरून घोडं अडलं आहे. महायुतीमध्ये भाजपाच्या १३२ जागा आल्या आहेत. या यशाबाबत फडणवीसांची रणनिती आणि दुसरीकडे शिंदे यांच्या लोक कल्याणकारी धोरणाना सुद्धा श्रेय दिल्या जाते. आता अडचण ही आहे की, एकाच वेळी दोन मुख्यमंत्री करता येत नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. तर शिंदे सेना बिहार मॉडेलची चर्चा करताना दिसत आहे.

ओबीसी मतांची बिदागी : भारतीय जनता पक्ष गेल्या दशकापासून सोशल इंजिनिअरिंगला अधिक महत्त्व देत आला आहे. त्यामुळे मुख्य पदावर ओबीसी चेहरा असणे सर्वात चांगले, अशी एक धारणा आहे. भाजपाने राष्ट्रपतीपासून ते राज्यपालांपर्यंत अनुसूचित जाती-जमातींना प्राधान्य दिले आहे. सध्या जातनिहाय जनगणनेविषयी राहुल गांधी आक्रमक असतानाच ओबीसी मतांवर ब्राह्मण मुख्यमंत्री पदावरून विरोधक हल्लाबोल करू शकतात. ज्या समाजाची जितकी लोकसंख्या, तितका त्याचा अधिकार अशी चर्चा सुरू आहे. बिहार आणि दिल्लीतील निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर फडणवीस यांचे नाव पुढे करताना भाजपाला हा मुद्दा अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत.

शिंदेंना डावलणे जोखमीचे : महायुतीचे सरकार येण्यासाठी त्यावेळीचे शिवसेनेतील बंड महत्त्वाचे ठरले होते. सध्या एकनाथ श्ािंदे यांच्या शिवसेनेने ५७ जागांवर यश मिळवले आहे. अजित पवारांकडे ४१ आमदारांचे संख्याबळ आहे. जर वाटाघाटी सामोपचाराने झाल्या नाही तरी भाजपाकडे अजित पवारांच्या भरवशावर सत्ता स्थापनेला अडचण नाही. पण हा धोका भाजपा स्वीकारणार नाही. एकनाथ शिंदे यांना डावलून अथवा त्यांची नाराजी ओढवून सत्तेत वाटेकरी होण्याचा मार्ग भाजपाला अडचणीचा ठरू शकतो. दुसरीकडे वाटाघाटी फिसकटल्या तर शिंदे यांचे ५७, अजितदादांचे ४१ आणि महाविकास आघाडीचे ४६ असे मिळून सत्ता स्थापन केल्यास हा आकडा १४४ पर्यंत येतो. बहुमतासाठी या आघाडीला सुद्धा एक जागा कमी पडू शकते.

मराठा समाजाची नाराजी : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची नाराजी एकदम समोर आली. मराठा पट्ट्यात भाजपाला मोठा फटका बसला. मराठा समाजाची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दिसून आली. मनोज जरांगे पाटील यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उघड मोर्चा उघडला. राज्यात मराठा आणि ओबीसी असा सामना सर्वांनीच पाहिला आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसवल्यास हा धोका समोर येऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR