सेलू : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याकरिता सुरू असलेल्या साखळी उपोषणा निमित्त विनापरवानगी मोटरसायकल व ट्रॅक्टर ची बेकायदेशीर रॅली काढणाऱ्या दहा जनासह इतर 40 ते 50 आंदोलकावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण मराठवाड्यात सुरू असलेल्या साखळी उपोषणादरम्यान कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या मोटरसायकल व ट्रॅक्टरची रॅली काढणाऱ्या जयसिंग शेळके प्रसाद काष्टे प्रसाद जोगदंड भाऊसाहेब झोल एकनाथ बोरुळ दत्तात्रय सोळंके भागवत मांडवगणे कृष्णा गायकवाड राहुल जंगले कपिल पडूळ यांच्यासह इतर 40 ते 50 जनावर सेलू पोलिसात भा द वी गुन्हा नंबर
480/ 2023 कलम 143 145 159 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून यासंदर्भात फिर्यादी प्रशांत कोंकडे पोलीस शिपाई पोलीस स्टेशन सेलू यांनी फिर्याद दिली असून तपास पोलीस उपनिरीक्षक जटाळ हे करत आहेत.
यांनी जिल्हाधिकारी परभणी यांनी यापूर्वीच परभणी जिल्ह्यात जमावबंदी आदेश कलम 37(1) (3) महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 1951 अन्वये आदेश दिलेले आहेत त्यामुळे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याचे कळते.