28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयमिझोरमचा निकाल सोमवारी

मिझोरमचा निकाल सोमवारी

राज्याचा निकाल एक दिवस लांबणीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर संपूर्ण देश ३ डिसेंबरला होणा-या मतमोजणीची प्रतीक्षा करत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने मिझोरममधील निकालाची तारीख बदलली आहे. आता येथे ३ डिसेंबरऐवजी ४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

कमिशनला ३ डिसेंबर २०२३ (रविवार) पासून मतमोजणीची तारीख बदलून इतर आठवड्याच्या दिवसात बदल करण्याची विनंती करणारे अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत. कारण ३ डिसेंबर हा रविवार मिझोरमच्या लोकांसाठी विशेष महत्त्व आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

मतदानापूर्वीच मिझोरममध्ये मतमोजणीची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती. यावर सर्व पक्षांचे एकमत होते. रविवार हा ख्रिश्चनांसाठी पवित्र दिवस असल्याचे मागणी करणा-यांनी सांगितले. त्यामुळे ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य असलेल्या मिझोरममधील मतमोजणीची तारीख बदलण्यात आली. ४० सदस्यीय मिझोरम विधानसभेसाठी ७ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले.

निवडणूक आयोगाला पत्र
मागणीबाबत सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले होते. या पत्रावर सर्व राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांच्या अध्यक्षांच्या सह्याही होत्या. रविवारी मिझोरममध्ये कोणताही अधिकृत कार्यक्रम आयोजित केला जात नाही, असे या पत्रात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR