नांदेड : वीटभट्टीवर काम करीत असताना ट्रॅक्टर उलटून चालक ठार झाल्याची घटना वाजेगाव येथे घडली. वाजेगाव परिसरात अनेक विटभट्टी आहेते. येथे कामगारांची संख्याही बरीच आहे. मंगळवारी सायंकाळी येथील एका विटभट्टीवर ट्रॅक्टरचालक म्हणून शेख आयुब हा काम करीत होता.
माती मिसळण्याचे काम करतांना अचालक ट्रॅक्टर उलटले. यात शेख गंभीर जखमी मृत पावला, असे वाजेगाव चौकीतील पोलिस कर्मचा-यांनी सांगीतले. रात्री उशीरापर्यत या घटने प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हयाची प्रक्रिया सुरू होती.