26.5 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात वादळी वा-यासह गारपिटीचा इशारा

राज्यात वादळी वा-यासह गारपिटीचा इशारा

पुणे : प्रतिनिधी
राज्यातील विविध भागांमध्ये २७ आणि २८ डिसेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात वादळी पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतक-यांना सावध राहण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

दरम्यान, राज्यात २६ डिसेंबरपासून ढगाळ हवामानाला सुरुवात होणार असून, २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील काही भागांत पावसाची शक्यता आहे. २७ डिसेंबरला खान्देश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील विविध भागांमध्ये पावसाच्या शक्यतेसह वादळी वा-यांची परिस्थिती तयार होण्याचा अंदाज आहे. २८ डिसेंबरला खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

२६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खान्देश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी आणि २८ डिसेंबर रोजी खान्देश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे) आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. या भागातील शेतक-यांनी यापुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

वादळी वा-यासह गारपिटीची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा सक्रिय पट्टा तयार झाला आहे आणि अरबी समुद्रात आर्द्रता वाढली आहे. यामुळे राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वा-यांसह पावसाची शक्यता आहे. याबरोबरच, राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. कडाक्याची थंडी कमी झाली असून, पुढील काही दिवसांत किमान तापमानात २-४ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाची सांगता वादळी पावसाने होणार असल्याचे हवामान खात्याच्या अंदाजावरून दिसत आहे.

शेतीपिके संकटात
शेतक-यांनी हवामानाच्या ताज्या अंदाजावर लक्ष ठेवून आवश्यक सावधगिरी बाळगावी आणि तयारी ठेवावी, अशी सूचना कृषि विभागाने केली आहे. शेतक-यांना कृषि विभागाने या स्थितीची तात्काळ दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीला मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे शेतक-यांनी पिकांची संरक्षण व्यवस्था, गारपीट प्रतिकारक उपाय, तसेच पिकांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कृषि विभागाने शेतक-यांना हवामानाच्या अंदाजाचे पालन करून पुढील नियोजन करण्याचे सुचवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR