महिला व मुलींचे फोटो एडिट करून युवकांना लुबाडण्याचे प्रकार

माढा : कुर्डुवाडी पोलिस ठाणे हद्दीमध्ये काही टोळ्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाइलमधील वेगवेगळ्या अ‍ॅपद्वारे सुंदर महिला व मुलींचे फोटो एडिट करून युवकांना आकर्षित करीत आहेत. मैत्री झाल्यानंतर संबंधितांना भेटण्यासाठी बोलावून निर्जन स्थळी घेऊन जाऊन त्या टोळ्यांच्या इतर सदस्यांच्या मदतीने त्याला मारहाण करून मोठ्या रकमेची मागणी करून लुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन कुईवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

कुईवाडी पोलिस ठाण्यात पडसाळी येथील शेतकरी अपहरणप्रकरणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस निरीक्षक चिल्लावार पुढे म्हणाले की, सध्या सोशल मीडियातून सुंदर मुलींचे व महिलांचे फोटो अपलोड करून त्यानंतर मैत्री केलेल्या युवकास भेटण्यासाठी बोलावून घेऊन त्यास निर्जन स्थळी घेऊन जाऊन टोळीतील सदस्यांच्या मदतीने त्यास मारहाण करून त्याच्या नातेवाइकांना फोन करून पैशांची मागणी करतान आढळत आहे. रस्त्याने जाणाऱ्या मोटरसायकलवरील लोकांना लिफ मागून त्यांना पुढे सोडण्याची मदत करण्याची विनंती करून त्यांनार्ह निर्जनस्थळी नेऊन लुटत आहेत.

टोळीतील सदस्यांच्या मदतीने मारहाण करून त्यांच्या जवळील सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान वस्तूही लुबाडून पुन्हा वरून मोठ्या रकमेची मागणी करत आहेत. त्यामुळे कोणीही अनोळखी व्यक्ती सोबत सोशल मीडिया वरती किंवा प्रत्यक्षात मैत्री करून चॅटिंग करू नये, तसेच प्रवास करताना अनोळख्या व्यक्तींना वाहनात व वाहनावर लिफ्ट देऊ नये, असेही आवाहन पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29
Video thumbnail
Nanded|माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
04:13
Video thumbnail
Ground Report|जिल्हा परिषदेसमोरच वाहतूक नियमांची ऐसीतैशी; पोलिस प्रशासन झोपलंय का?
07:20
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32

Latest news