25.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रमुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांकडे आग्रह

मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांकडे आग्रह

मराठवाड्यातील पक्षनेत्यांकडून मागणीला जोर
मुंबई : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकारण चांगलेच तापले जात असून, देशमुख यांच्या निर्घृण हत्येमागे मुंडे यांचे कार्यकर्तेच असून, त्यांनी बीड जिल्ह्यात दहशत निर्माण केल्याचा आरोप सर्वपक्षीय नेते करीत आहेत. यासोबतच माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही सुरुवातीपासून मुंडेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी सातत्याने राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तसेच आता मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे नेतेही मुंडेंच्या राजानाम्याबाबत आग्रही असून, तशी मागणी उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. मुंडे यांची खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी जवळीक आहे. त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्येतही वाल्मिकच मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिकच्या वाढत्या गुन्हेगारीमागे मुंडे यांचेच पाठबळ कारणीभूत असल्याचा थेट आरोप होत असल्याने मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे नेते आता मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पक्षाकडे करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

एकाधिकारशाही मोडित
काढण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी काळात मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, त्याचबरोबर ही एकाधिकारशाही मोडीत काढावी, अशी मागणी मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांच्याकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR