25.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रआमच्या एकत्र येण्याची राजकीय चिंता नको : भुजबळ

आमच्या एकत्र येण्याची राजकीय चिंता नको : भुजबळ

पवार यांच्यासोबत कितीही वेळा एकत्र येऊ शकतो 
चाकण : प्रतिनिधी
पवारसाहेब आणि मी एका व्यासपीठावर एकत्र येणार, अशा अनेक चर्चा रंगल्या. आम्ही चांगल्या कामासाठी, कार्यक्रमासाठी एकत्र येतो. पण अनेकांना आम्ही एकत्र येण्याचे आश्चर्य वाटले. परंतु फुले-शाहू-आंबेडकर ही आमची दैवते आहेत. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी मी आणि शरद पवार कितीही वेळा एकत्र येऊ शकतो. याची राजकीय चिंता कुणी करू नये, असे माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ््याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, सचिन अहिर या वेळी उपस्थित होते.

‘महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजात क्रांती घडविली. महात्मा फुले यांचा लढा अंधश्रद्धा, ब्राम्हण्यवादाविरोधात होता. शेती, बेरोजगारीवर त्यांनी लिहिले. त्यांच्यावरही अन्याय झाला. त्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठविला. मंडल आयोगाची अंमलबजावणी शरद पवार मुख्यमंत्री असताना झाली. त्यामुळे महात्मा फुलेंच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी शरद पवार यांच्यासारख्या योग्य व्यक्तीची निवड केली, असे गौरवोद्गार भुजबळ यांनी काढले.

शेतक-यांचे दु:ख कमी करण्यासाठी राज्यकर्त्यांनी महात्मा फुले यांचा आदर्श डोळ््यांसमोर ठेवून शेतकरीहिताचे निर्णय, कायदे करावेत. महात्मा फुले यांनी विज्ञानाचा विचार रुजविला. संकरित धान्य, बियाणे वापरण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राबरोबरच उत्तर भारतातही महात्मा फुले यांचे नाव घराघरांत पोहोचले आहे. त्यांच्या कार्याची नोंद देशपातळीवर घेतली आहे, असे शरद पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR