मुंबई : देशातील चार राज्यांतील निवडणुकांचे कौल आता समोर आले आहेत. यामध्ये चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजप वरचढ ठरल्याचे पाहायला मिळत आहे. यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आता भाजप सगळीकडे नंबर १ पक्ष असणार असल्याचे त्यांनी म्हटले. भाजप आणि देवेंद्रजी मिळून भाजप सत्तेत आणणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी अमृता फडणवीसांनी दिली.
दरम्यान, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अपेक्षा असतानाही त्यांना जनतेने नाकारले आहे. त्यामुळे १९८० नंतर पहिल्यांदाच उत्तर भारतातील हिंदी बेल्टमध्ये काँग्रेसची सत्ता नसेल.
भाजप आता इथून पुढे सगळीकडे नंबर १ चा पक्ष राहणार. महाराष्ट्रामध्येही देवेंद्र फडणवीस भाजपच्या मागे आणि भाजप देवेंद्र फडणवीसांच्याच मागे राहणार आणि भाजप आणि देवेंद्रजी मिळून भाजप आणणार. आजचा निकाल हा अपेक्षितच होता. आता इथून पुढे तुम्हाला सगळीकडे भाजपच दिसेल, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली.