17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रराष्ट्रीय मानवाधिकार आयोग करणार हत्येची चौकशी

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग करणार हत्येची चौकशी

संतोष देशमुख हत्या प्रकरण, खा. सोनवणेंच्या मागणीला यश
मुंबई : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही दखल घेतली असून, आयोगाने स्वतंत्र गुन्हा नोंद करून घेतल्याची माहिती, खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली. तपास यंत्रणांसह आता मानवाधिकार आयोगदेखील या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करणार आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी निर्घृण हत्या झाली. ६ जणांनी बेदम मारहाण करीत संतोष देशमुख यांचा जीव घेतला, हे उघड झाले. विविध हत्यारांनी मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याने त्यांच्या शरीरात दीड लीटर रक्त साकळले होते. अमानवी पद्धतीने केलेल्या या हत्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घ्यावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ३ जानेवारी रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानुनगो यांची भेट घेऊन केली होती. यावेळी त्यांनी या घटनेत मानवाधिकाराचे उल्लंघन झाले असल्याने याची दखल घ्यावी, अशी विनंतीही केली होती.

या मागणीची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्याची घोषणा आज केली. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी, सीआयडीमार्फत चौकशी होत असताना आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगही या प्रकरणाची चौकशी करणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांभोवती आता आणखी फास आवळण्याची चिन्हे आहेत.

या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, प्रतिक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. यातील जवळपास सर्व आरोपींना अटक केलेली आहे. आता फक्त कृष्णा आंधळे फरार असून, त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

चौकशीसाठी स्वतंत्र
टीम पाठविणार
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आपली एक स्वतंत्र टीम पाठवून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच तपास करणार आहे. देशमुख यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली गेली आहे. त्यामुळे याचा सखोल तपास करून या संपूर्ण घटनेचा अहवाल मागविणार आहे. विशेष म्हणजे सीआयडी, एसआयटीमार्फत तपास होत असल्याने त्यावरही मानवाधिकार आयोग लक्ष ठेवणार आहे, असे सांगण्यात आले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR