22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रनवनीत राणांनी उडवली भाजपाची पतंग

नवनीत राणांनी उडवली भाजपाची पतंग

अमरावती : प्रतिनिधी
अमरावती येथील राणा दाम्पत्याचे राजकारण म्हणजे चर्चेचा विषय असतो. आज अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याचा पतंग महोत्सव साजरा झाला. या वेळी आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाची पतंग बदवली तर भाजपच्या नेत्या माजी खासदार नववीत राणा यांनी भाजपाची पतंग बदवली. यंदा रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजपाच्या संयुक्त युतीच्या पंतगांनी आकाशात चांगलीच भरारी घेतलीय.

दरम्यान, राणा दाम्पत्याचा पंतगमहोत्सव अमरावतीत साजरा झाला. या पंतगमहोत्सवाला मेळघाटचे भजपाचे आमदार केवळराम काळे यांनी सुद्धा हजेरी लावत पतंग महोत्सव साजरा केला. यावेळी वनीत राणा यांनी उखाणा घेत सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपण भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे यावर्षी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची पतंग उडवली आणि आकाशात सुद्धा महायुतीचे गटबंधन दिसून आले असे यावेळी राणा दाम्पत्याने सांगितले. नवनीत राणा म्हणाल्या की राजकारणात लिमिट क्रॉस करून कोणी कोणावर बोलू नये, जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप कडू बोलतात त्यांना माझा एकच सल्ला आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.

राणा यांचा उखाणा
‘‘माझ्या श्वासापेक्षाही जास्त महत्व रवी राणा यांचं माझ्या जीवनात आहे, शंकराच्या पिंडीवर संर्त्याची फोड रवीजींचं बोलणं साखरपेक्षा गोड असे म्हणताच सर्वांनी टाळ्या वाजत दोघांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR