लखनौ : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ही दीर्घ लढाई आहे, आम्ही निराश नाही. लोकशाहीत असे निकाल येतात. मी बसलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजपने पाच लाख मतांनी विजय मिळवला तरीही त्याचा अर्थ असा नाही की, सर्वांचाच पाठिंबा त्यांना मिळत आहे. प्रत्येकाचा विकास होत आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, अजूनही अनेक लोक निराश आहेत, त्यांना आशा होत्या, त्यांच्या आशा तुटल्या आहेत. राजकारणातील हे परिणाम आहेत, जो राजकीय पक्ष असेल तो याला स्वीकारेल. हा लढा मोठा आहे, या निकालांमुळे आम्हाला आणि ज्यांना भाजपला सामोरे जावे लागणार आहे त्यांना खूप तयारी करावी लागेल. आम्हाला अतिशय शिस्तबद्ध राहून त्या गोष्टींचा सामना करावा लागेल. रणनीतीनुसार भाजपला अशी स्थिती मिळत आहे. त्यामुळे मला आशा आहे की आगामी काळात निकाल वेगळे असतील.